AH MaHaBMS App:- नमस्कार शेतकरी मित्रांनो “Media 24 Tass” मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का? पशु संवर्धन विभागाअंतर्गत राज्यात आणि देशात वारंवार नवनवीन योजना राबविल्या जात असून आत्ताही पशुसंवर्धन विभागाअंतर्गत नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे . AH MaHaBMS हीपण पशुसंवर्धन विभागामार्फत सुरु केलेली एक राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची योजना आहे. या योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 90% अनुदानावर जनावरे वाटप करण्यात आले असून आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी या महाबीएमएस योजनेचा लाभ घेतला आहे. तुम्हीही AH MaHaBMS Online अर्ज करून 90% अनुदानावर गाई – म्हशी खरेदी करू पाहत असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा लेख ठरणार आहे.
आज आपण या ठिकाणी या लेखाच्या माध्यमातून AH MaHaBMS Application बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. जसे – AH MaHaBMS योजना काय आहे? AH MaHaBMS Online Registration कसे करायचे? किती अनुदान मिळणार? लाभार्थी कोण असणार आहेत? आवश्यक कागदपत्र कोणते आहेत? आणि सर्वात महत्वाचे AH MaHaBMS List कशी पाहायची? याची सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आजची हि माहिती संपूर्ण जाणून घेतल्यानंतर तुम्हीही AH MaHaBMS योजनेअंतर्गत अर्ज करून 90% अनुदानावर जनावरे खरेदी करू शकता.
तर मित्रांनो आपण मागील लेख मध्ये Yashwantrao Chavan Gharkul Yojana 2025 बद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेतलेली आहे. जर तुम्ही अजून देखील आपला मागील लेख यशवंतराव चव्हाण घरकुल योजना 2025 बद्दल माहिती पाहिली नसेल तर लगेच पहा.
अशाच नवनवीन योजनांची माहिती घरबसल्या मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअँप किंवा टेलिग्राम ग्रुपच्या बटणवर क्लिक करून व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करून सरकारी योजनांचे सर्व नवनवीन अपडेट्स घरबसल्या मिळवू शकता.
AH MaHaBMS App
योजनाचे नाव | AH MaHaBMS |
विभाग | पशुसंवर्धन विभाग |
शासन | केंद्र शासन |
चालू वर्ष | 2025 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज करण्याची वेबसाईट | https://ah.mahabms.com |
AH MaHaBMS Scheme
भारत देश कृषी प्रधान देश असल्याने देशातील बरीच लोकसंख्या शेती व्यवसायावर अवलंबून आहे. परंतु शेतीमध्ये शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने तसेच पिकांवरील वाढत्या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या शेती करण्यास परवडत नसल्याचे दिसून येत आहे. देशातील शेतकरी शेतीसोबत इतर कोणतातरी शेतीला पूरक असा व्यवसाय करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे शेतकरी गायी पालन, म्हशी पालन, कुकुटपालन असे अनेक शेतीपूरक व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु शेतीपूरक जोड धंदा सुरु कारण्यासाठी पैश्याची कमतरता भासत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे गायी पालन, म्हशी पालन, शेळी पालन, मेंढी पालन, कुकुटपालन असे व्यवसाय करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाहीत. या सर्वांचा विचार करता केंद्र सरकारने पशुसंवर्धन विभागामार्फत Ah MahaBMS हि योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत देशातील सर्व शेतकऱ्यांना 90% अनुदानावर दुधाळू जनावरांचे गट वाटप करण्यात येत आहेत.
आतापर्यंत देशातील बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून आता केंद्र सरकारने या योजनेसाठी अजून अर्ज मागविले असून सध्या या योजनेबद्दल ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली असून देशातील जे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकले नाहीत असे सर्व शेतकरी अर्ज करून Ah MahaBMS योजनेअंतर्गत लाभ घेऊन 90% अनुदानावर गायी-म्हशी, शेळी-मेंढी त्यांचे गट खरेदी करू शकतात.
ऑनलाईन अर्ज
Ah MahaBMS या योजनेअंतर्गत 2025 मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या नवीन अर्जदारांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेपचा वापर करून अर्ज करू शकता.
Step 1:- सर्वात आधी “Ah MahaBMS App” मोबाईलमध्ये डाउनलोड करा किंवा Ah MahaBMS योजनेच्या अधिकारीक वेबसाईटला भेट देण्यासाठी “Ah MahaBMS Application” या लिंकवर क्लिक करा.
Step 2:- त्यानंतर लॉगिन करण्यासाठी “लॉगिन” या बटणवर क्लिक करून, तुमचा आधारशी लिंक असलेला मोबाइल नंबर किंवा आधार क्रमांक टाकून “गेट ओटीपी” या बटणवर क्लिक करा.
Step 3:- तुमच्या मोबाईल वर आलेला ओटीपी आहे तसा लिहून “लॉगिन” बटणवर क्लिक करा.
Step 4:- आता तुमच्यासमोर एक अर्ज ओपन होईल अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरून “सबमिट” बटणवर क्लिक करा.
अश्या प्रकारे तुम्ही Ah MahaBMS App डाउनलोड करून App मदतीने किंवा अधिकारीक पोर्टलला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी तुमच्या मोबाईल नंबरवर “AD-TECSSP” या नावाने एक SMS येईल. SMS आल्यानंतर “कागदपत्र अपलोड करा” या लिंक वर क्लिक करून खालील सर्व कागदपत्र अपलोड करा. आवश्यक सर्व कागदपत्रांची यादी खाली दिलेली आहे. कागदपत्र अपलोड केल्यानंतर काही दिवसांनी लाभार्थी यादी प्रमाणे दुधाळू जनावरे खरेदी करू शकता.
आवश्यक कागदपत्र
1) अर्जदाराचे आधार कार्ड
2) सात बारा / ८ अ
3) आपत्य दाखला
4) स्वघोषणा प्रमाणपत्र
5) पासपोर्ट साईझ फोटो
6) सात बारा नावावर नसल्यास जमीन भाडे तत्वावर असल्यास जमिनीचा करारनामा
7) रहिवाशी प्रमाणपत्र
8) जातीचा दाखला
9) उत्पन्न दाखला
10) रेशन कार्ड
11) दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र
12) बँक पासबुक
13) बचत गट सदस्य असल्यास बचत गटाच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
14) कोणत्याही संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचे प्रमाणपत्र
15) जन्म तारखेचा पुरावा
16) शाळा सोडल्याचा दाखला
17) जॉब कार्ड
Ah MahaBMS List – यादी
पशुसंवर्धन विभागामार्फत दर वर्षी mahabms योजनेअंतर्गत गायी-म्हशी, शेळी-मेंढी, कुकुटपालन करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवत असून यावर्षीही अर्ज मागविण्यात आले असून गेल्या वर्षी केलेल्या अर्जाची यादी हि आलेली आहे. MAHABMS योजनेअंतर्गत 90% अनुदानावर जनावरे खरेदी करता येतात. मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जाची लाभार्थी यादी आली असून, यादीमध्ये नाव असणाऱ्या लाभार्थ्यांना 90% अनुदानावर गायी-म्हशी, शेळी-मेंढी, आणि कुकुटपालन करण्यासाठी दुधाळू जनावरे खरेदी करता येणार आहेत.
FAQs – महाबीएमएस योजनेसंबंधित काही महत्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे
केंद्र सरकारने AH MAHABMS हि योजना कोणत्या विभागामार्फत राबविण्याचा निर्णय घेतला आहे?
केंद्र सरकारने AH MAHABMS हि योजना पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्याचा निर्णय घेतला असून देशातील सर्व शेतकरी या योजनेअंतर्गत 90% अनुदानावर दुधाळू जनावरे खरेदी करू शकणार आहेत.
AH MAHABMS योजनेअंतर्गत किती गायी आणि म्हशींचा गट वाटप करण्यात येत आहेत?
AH MAHABMS App अंतर्गत 2 गायी किंवा 2 म्हशी असा गट वाटप करण्यात येत आहे.
AH MAHABMS योजनेअंतर्गत किती टक्के अनुदानावर गायी आणि म्हशी खरेदी करता येणार आहेत?
AH MAHABMS योजनेअंतर्गत 90% अनुदानावर 2 गायी किंवा 2 म्हशी खरेदी करता येणार आहे.
AH MAHABMS या योजनेचा हेल्पलाईन नंबर कोणता आहे?
1962 किंवा 1800-233-0418 असे दोन हेल्पलाईन नंबर वरती संपर्क करून AH MAHABMS App संबंधित सर्व माहिती जाणून घेऊ शकता.
AH MAHABMS योजनेच्या लाभार्थी यांना अर्ज केल्यानंतर कोणत्या नावाने SMS आल्यानंतर कागदपत्र अपलोड करायची आहेत?
AH MAHABMS योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी AD-TECSSP या नावाने SMS आल्यानंतर AH MAHABMS App Login करून सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करायची आहेत.
Conclution
तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी AH MAHABMS App बद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला AH MAHABMS योजनेसंबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. जसे – AH MAHABMS योजना काय आहे? किती टक्के अनुदान मिळणार? आवश्यक कागदपत्र कोणते आहेत? ऑनलाईन अर्ज कसा करायचा? यादी ऑनलाईन घरबसल्या कशी पाहायची? कागदपत्र अपलोड कसे करायचे? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत. तरी अजून AH MAHABMS App बद्दल काही अडचण असेल किंवा हि माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर अश्याच इतर योजनांची माहिती आणि नवनवीन अपडते मोबाईलवर मिळविण्यासाठी खालील व्हाट्सअँप बटणवर क्लीक करून व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करून सर्व माहिती जाणून घेऊ शकता. धन्यवाद.